एखादा व्यक्ती तथाकथित शुद्ध चारित्र्याचा / उच्च नैतिकतेचा असू शकतो.
एखाद्या व्यक्तीचे रहाणीमान अत्यंत साधे असू शकते.
एखादा व्यक्ती सांसारिक गोष्टींचा त्याग करून त्याच्या दृष्टीने अत्युच्च असणाऱ्या गोष्टीसाठी आयुष्यभर झटू शकतो.
एखादा व्यक्ती व्यक्ती एखाद्या मागणीसाठी अन्नत्याग करू शकतो.
इत्यादी, इत्यादी...
म्हणून --
* तथाकथित शुद्ध चारित्र्य / उच्च नैतिकता ,
[तथाकथित यासाठी, की त्याची कुठली वस्तुनिष्ठ परिमाणं नाहीत. व्यक्तिपरत्वे बदलू शकते]
• साधी राहणी,
• संसार पराङ्मुखता,
• अन्नत्याग,
• आत्मघात,
इत्यादी, इत्यादी...
या गोष्टी आहेत,
केवळ याच कारणासाठी एखाद्या व्यक्तीचा विचार / आचार योग्य ठरत नाही किंवा त्यामुळेच त्याला पाठिंबा देणं योग्य ठरत नाही.
ती व्यक्ती, तत्सम कृती कुठल्या उद्दिष्टासाठी करत आहे, ते उद्दिष्ट काय, व्यक्तीचा हेतू काय आहे, आणि त्या उद्दिष्टातून अंतिमतः प्राप्त होणारं साध्य काय आहे आणि त्या साध्याबद्दल तत्सम कृती करणारी व्यक्ती किती जागरूक आहे, आणि त्या व्यक्तीच्या हेतूबद्दल, उद्दिष्टाबद्दल आणि जागरूकतेबद्दल पाठिंबा देणारे किती जागरूक आहेत....
या गोष्टी त्या व्यक्तीचा आचार, विचार आणि लोकांचा त्याला पाठिंबा योग्य किंवा अयोग्य आहे हे ठरवत असतात.
बाकी, आपल्याकडे माणूस जेवढा साधा दिसत असेल तेवढं मोठेपण आपण त्याला बहाल करत असतो. मात्र साधेपणा हा साधनशुचितेचा एक भाग असू शकतो, एवढ्या गुणापर्यंत साधेपणाचं कौतुक मर्यादित हवं. पण आपल्याकडे साधेपणा हाच मोठेपणाचा सगळ्यात मोठा निकष ठरतो, आणि मग अत्यंत निष्पाप भाबडेपणाने व्यक्तीभोवतीचा जनसमुदाय वाढत जात असताना त्रयस्थ यंत्रणेकडून जो अत्युच्च पातळीचा च्यूत्झपा साधला जातो तो मात्र दीर्घकालीन प्रतिकूल परिणाम करणारा ठरतो...
अभिजीत | १७ जुलै २६
No comments:
Post a Comment